वेदाचिया मते विसरुनि
1418.
वेदाचिया मते विसरुनि कीर्तन । करती जे पठण शीण त्यांसी ॥१॥
वेदाचा अर्थ न कळेची पाठका । कीर्तनी नेटका भाव सोपा ॥२॥
श्रुतीचेनी मतें पाहे तो उच्चार । परी सारासारविचार कीर्तनी ॥३॥
एका जनार्दनी पुराणाच्या गोष्टी । कीर्तन वाक्पुटी करा सुखें ॥४॥
