वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

नको नको मना गुंतु मा

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072687 · अभंग क्र. १०६

106.
नको नको मना गुंतु मायाजाळी । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥
काळाची ही उडी पडेल बा जेव्हा । सोडविना तेव्हा मायबाप ॥२॥
सोडविना बंधु पाठिची बहिण । शेजेची कामीन दुर राहे ॥३॥
सोडविना राजा देशीचा चौधरी । आणिक सोइरी भली भली ॥४॥
तुका म्हणे तुला सोडविना कोणी । एका चक्रपाणि वांचूनिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग