अहो क्रोधे यावे कोठे
11.
अहो क्रोधे यावे कोठे । अवघे आपण निघोटे ॥१॥
ऐसे कळले उत्तम । जन तेची जनार्दन ॥२॥
ब्रीद बांधिले चरणी । नये दाविता करणी ॥३॥
वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥४॥
ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥