वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080579 · अभंग क्र. ३४६५

3465.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
शाक्तांची शूकरी माय । विष्ठा खाय बिदीची ॥१॥
तिची त्या पडली सवे । मागे धावे म्हणोनि ॥धृपद॥
शाक्तांची गाढवी माय । भुंकत जाय वेसदारा ॥२॥
तुका म्हणे शिंदळीचे । बोलता वाचे निंद्य ते ॥३॥

अर्थ :
शाक्त उपासकांची माय सुकरीन आहे आणि ती रस्त्यावरची विष्ठा खाते. तिला तर विष्ठा खाण्याची सवय असतेच त्यामुळे हे शाक्त तिचे मुले आहेत ते देखील तिच्या पाठीमागे मागे विष्ठा खाण्यास धावत असतात. शाक्त उपासकांची माय गाढवीन असते ती भुंकत भुंकत वेशीपर्यंत जाते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे ही गाढवीन ओरडत ओरडत वेशीपर्यंत जाते परंतू हे शिंदळीचे आहेत याचे नांव देखील वाणीने घेतले तरी ते निंदय आहेत.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग