यशोदा स्थिती
205.
यशोदा स्थिती
पडियेली जेव्हा यशोदेसी भ्रांती । ऐके परीक्षिती प्रेम तिचे ॥१॥
खोडी नको करू ह्मणे दटाविले । ह्मणोनि रुसले तान्हे माझे ॥२॥
नंदासी ह्मणत पाहू कोठे कृष्णा । दाटलासे पान्हा स्तनी माझ्या ॥३॥
उद्धव चित्तांत करीतसे खेद । यशोदे सावध होई माते ॥४॥
निर्दय पापीण बांधी मी उखळासी । म्हणोनि रुसलासी देवराया ॥५॥
माती खाता वेळे तुज मी मारिले । म्हणोनि टाकिले मजलागी ॥६॥
नामा ह्मणे त्यांचे करी समाधान । सांगे ब्रह्मज्ञान दोघांजणा ॥७॥
