वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › ४, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०२ ते ७०१

सगुणीच्या राती निर्ग

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074372 · अभंग क्र. ६५१

651.
सगुणीच्या राती निर्गुणी दिवटा ।
सांगती चोहटा वाग् पंथ ॥१॥
वागेश्वर हरि वाचेचा वाचक ।
आधीचाही अर्क दीपतेजे ॥२॥
साकारी निराकार बिंबी बिंबअवतार ।
अवघे माजिघर बिंबलेसे ॥३॥
बापरखुमादेविवरू ॐतत्सदाकारू ।
निवृत्ति निर्धारू माजीवटा ॥४॥

अर्थ :
सर्व मायाकार्याच्या पलिकडचा असून तो परमात्मा शुद्ध ज्ञानाचे घर आहे. तसेच तो सर्व जीवांच्या हृदयांत व्यापून आहे. असे चारी वेदातील वाक्ये सांगतात. पण वागेश्वर श्रुतिमाऊली तिला बोलविणारा श्रीहरिच आहे. कारण सर्वांच्या आधी सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे. उपाधी घेऊन तुम्ही साकार म्हणा की उपाधि टाकून निराकार म्हणा पण त्या सर्वांत श्रीहरिच प्रकाशमान झालेला आहे. माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते ॐ तत् सत् अशा । आकाराचे आहेत. त्यांच्या स्वरूपाचा निर्धार श्रीगरू निवृत्तिरायांनी मला करून दिला. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग