पाहाता श्रीमुख सुखाव
17.
पाहाता श्रीमुख सुखावले सुख । डोळीयांची भूक न वजे माझ्या ॥१॥
जिव्हे गोड तीन अक्षरांचा रस । अमृत जयास फिके पुढे ॥धृ॥
श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध । गेले भेदाभेद निवारोनि ॥२॥
महामळें/महाबळे मन होते जे गादले । शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे ॥३॥
तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन । विठ्ठल निधान सांपडले ॥४॥
