घालुनिया भार राहिलो
382.
घालुनिया भार राहिलो निश्चिती ।
निरविले संती विठोबासि ॥१॥
लावूनिया हाते कुरवाळिला माथा ।
सांगितले चिंता न करावी ॥धृ॥
कटी कर सम चरण साजिरे ।
राहिला भीवरे तीरी उभा ॥२॥
खुंटले सायास अणिकि या जीवा ।
धरिले केशवा पाय तुझे ॥३॥
तुज वाटे आता ते करी अनंता ।
तुका म्हणे संता लाज माझी ॥४॥
लावूनिया हाते कुरवाळिला माथा ।
सांगितले चिंता न करावी ॥धृ॥
