वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

मी तो विकलो तुमचिये

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075311 · अभंग क्र. १६७

167.
मी तो विकलो तुमचिये पायी । जीवभाव सर्वहि अर्पियेला ॥१॥
माझा मीच झालो उतराई देवा । तुमचे तुम्ही पाहा आम्हांकडे ॥२॥
नव मास माता वोझे वाहे उदरी । तैसीच ही परी तुमची माझी॥ ॥३॥
अपत्य आपुले फिरे देशीदेशी । ही लाज कोणासी चोखा म्हणे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग