वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 22. संत चोखामेळा, चोखोबाराय › 1. संत चोखामेळा अभंग गाथा › १. संत चोखामेळा अभंग गाथा ३५८ › ६. करुणा

माया माहोजाळे गुंतलो

🙏 22. संत चोखामेळा, चोखोबाराय · ABH-075298 · अभंग क्र. १६६

166.
माया माहोजाळे गुंतलोसे बळे । यांतोनी वेगळे करी गा देवा ॥१॥
न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ बुडालोंसे निश्रांत याचमाजी ॥२॥
न घडे देवार्चन संतोंचे पूजन । मन समाधान कधी नव्हें॥ ॥३॥
नसतेचि छंद लागती अंगासी । तेणे कासावीस जीव होय ॥४॥
चोखा म्हणे याही चोरे नागविलो । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग