वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 138. श्री विठ्ठल स्तुती आणि भक्तवत्सलता

अज्ञानबाळके तुझा हाक

🙏 4. संत नामदेव · ABH-083774 · अभंग क्र. ४८३

483.
अज्ञानबाळके तुझा हाकारा केला । तेणे तये वेळा स्वर्ग भेदिला । ऐकूनि तो धाविन्नला । अवो देवी खेचरे ॥१॥
स्तंभी प्रगटलीसे हाक । कापिन्नले तिन्हि लोक । भेणे पळती शंखा – दिक । आणि कैलास आंदोळले ॥२॥
आली त्रिभुवन देवता । नाभी नाभीरे म्हणता । माझा प्रर्‍हाद केउता । तो कवणे रे गांजिला ॥३॥
वदन पसरूनि विकाळ । झरझरीत झरे लाळ । नेत्र जैसे वडवानळ । शोषू पाहे जळनिधि ॥४॥
संहार झाला नागकुळ । भ्याले अष्टहि लोकपाळ । स्वर्गी सुटली खलबळ । अमरावती इंद्रासी ॥५॥
मग दैत्याते पाचारित । लोह खणखणा वाजत । हाकी अंबर गर्जत । तेणे कांपे मेदिनी ॥६॥
कवटाळूनि चहू हाती । विदारिले चपेट-घाती । जैस रुद्र प्रळयांती । तैसा हरी दिसतसे ॥७॥
दैत्य न मरे कवणे परी । मग तो धरिला जान्हूवरी । देखे उदर फोडूनि सत्वरी । अस्थि चूर्ण केली या ॥८॥
मौजे नाचती । मुक्ति दिल्ही दैल्य-नाथा । नामया स्वामि वरदहस्ता । अभयदाता भक्तांसी ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग