येऊनिया परिसा बोले र
3626.
येऊनिया परिसा बोले राजाईसी । आमुचा परीस मजसी देई बाई ॥१॥
राजाई तंव म्हणे घेऊनि नामदेवें । गेले ते स्वभावे राउळासी ॥२॥
तुम्ही बसा घरी मी जाते राउळीं । म्हणोनिया वेगी आली राउळासी ॥३॥
घालूनिया नामा दंडवत देवा । सांगितला भाव सर्व मनींचा ॥४॥
एका जनार्दनी नामदेव बोले । परिसा टाकियेले चंद्रभागें ॥५॥
