देव म्हणे नाम्या परी
3625.
देव म्हणे नाम्या परीस कोठे आहे । पाहू लवलाहे दावी मज ॥१॥
हांसूनिया नामा पांडुरंगा सांगे । परीस चंद्रभागे टाकियेला ॥२॥
ऐसे प्रेमभरीत बोलताती दोघे । तो राजाई ती मागे त्वरे आली ॥३॥
घालूनि दंडवत देवासी आदरे । नामयासी उत्तरें बोलतसे ॥४॥
एका जनार्दनी मागावया परीस । परिसा घरास त्वरित आला ॥५॥
