भाविकाचे अवघेचि गोड
287.
भाविकाचे अवघेचि गोड ।
करुनि कोड स्वीकारी ॥१॥
भोळा नाथ पंढरीचा ।
न करी दासाचा अतिक्रम ॥२॥
न म्हणे रुक्ष थोडे काही ।
घाली अवघेंही मुखींचि ते ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
उभा तिष्ठत विटेवरी ॥४॥
287.
भाविकाचे अवघेचि गोड ।
करुनि कोड स्वीकारी ॥१॥
भोळा नाथ पंढरीचा ।
न करी दासाचा अतिक्रम ॥२॥
न म्हणे रुक्ष थोडे काही ।
घाली अवघेंही मुखींचि ते ॥३॥
निळा म्हणे कृपावंत ।
उभा तिष्ठत विटेवरी ॥४॥