वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 143. नाम महिमा

गोक्षीर लाविले अंधळि

🙏 4. संत नामदेव · ABH-083294 · अभंग क्र. ६५१

651.
गोक्षीर लाविले अंधळिया मुखी | तेथील पारखी जिव्हा जाणे ॥१॥
तैसे देवा तुझे नाम निरंतर | जिव्हेसी पाझर अमृताचे ॥२॥
सोलूनिया केळे साखरे घोळिले | अंधारी खादले तरी गोड ॥३॥
द्राक्षफळा घड सेविता चोखड | तयाहूनि गोड नाम तुझे ॥४॥
आळूनिया क्षीर तुपाचिये आळे | कालविले गुळे गोड जैसे ॥५॥
जाणोनिया नामा करी विनवणी | अमृताची खाणी नाम तुझे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग