वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

दास्य करी दासांचे ।

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072934 · अभंग क्र. ४०५३

4053.
दास्य करी दासांचे । उणे न साहे तयांचे । वाढिले ठायीचे । भाणे टाकोनिया धावे ॥१॥
ऐसा कृपेचा सागर । विटे उभा कटी कर । सर्वस्वे उदार । भक्तांलागी प्रगटे ॥धृपद॥
हृदयी श्रीवत्सलांछन । मिरवी भक्तांचे भूषण । नाही तयाचा सीण । सुख धरिले लातेचे ॥२॥
सत्यभामा दान करी । उजुर नाही अंगीकारी । सेवकाच्या शिरी । धरूनि चाले पादुका ॥३॥
राखे दारवंटा बळीचा । सारथी झाला अर्जुनाचा । दास सेवकांचा । होय साचा अंकित ॥४॥
भिडा न बोले पुंडलिकाशी । उभा मर्यादा पाठीशी । तुका म्हणे ऐसी । का रे न भजा माउली ॥५॥

अर्थ :
देव त्याच्या दासांचेही दास्यत्व करतो त्यांना काही कमी पडले तर देवाला सहन होत नाही. देव त्याच्या दासांचा इतका आधीन झालेला आहे की, त्याला जर जेवणासाठी ताट वाढले आणि त्याच्या दासाचे काही कार्य निघाले तर त्याला जेवणाचे देखील भान राहात नाही तो जेवणाचे ताट तसेच टाकून दासाचे काम करण्याकरता धाव घेतो. असा तो देव कृपेचा सागर आहे त्याने आपले दोनही कर कटेवर ठेवून विटेवर तो उभा आहे. अशा प्रकारचा सर्वस्वी उदार असणारा देव भक्तांसाठी प्रगट होतो. हरीच्या ह्दयावर भृगुऋषींनी लाथ मारली त्यावेळी त्यांच्या ह्दयावर भृगुऋषींच्या पावलांची चिन्ह उमटली अशा प्रकारचे भूषण आपल्या ह्दयावर हरी अभिमानाने मिरवतो. भृगुऋषींनी हरीच्या वक्षस्थळावर लाथेचा प्रहार केला त्यावेळी हरीला त्याचा त्रास झाला नसून उलट सुख झाले. सत्यभामेने श्रीकृष्ण भगवंताचे दान नारदाला ज्यावेळी दिले त्यावेळी भगवंताने सत्यभामेला थोडा देखील विरोध केला नाही. देवाने ते मान्य केले आणि आपल्या सेवकाच्या पाद

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग