वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 11. नाटाचे अभंग › नाटाचे अभंग

उभा देखिला भीमातीरी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072920 · अभंग क्र. ४०५२

4052.
उभा देखिला भीमातीरी । कर मिरवले कटावरी । पाउले तरी समचि साजिरी । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥
शंख चक्रांकित भूषणे । जडितमेखळा चिद्रत्ने । पितांबर उटी शोभे गोरेपणे । लोपली तेणे रवितेज ॥२॥
श्रवणी कुंडले देती डाळ । दशांगुळी मुद्रिका माळ । दंत ओळी हिरे झल्लाळ । मुख निर्मळ सुखरासी ॥३॥
कटी कडदोरा वांकी वेळा । बाही बाहुवटे पदक गळा । मृगनाभी रेखिला टिळा । लवती डोळा विद्युल्लता ॥४॥
सुंदरपणाची साम्यता । काय वर्णु ते पावे आता । तुकयाबंधु म्हणे रे अच्युता । धन्य ते माता पिता प्रसवली ॥५॥

अर्थ :
मी देवाला भीमेच्या तीरावर आपले दोन्ही ही कर कटावर ठेवुन उभे असलेले पाहिले आहे. हरीचे पाऊले समान व साजिरे आहेत त्याचे नाम अनंत व अतिगोड आहे. शंख, चक्र, पद्म, गदा ही आयुधे शस्त्रे त्याच्याकडे आहेत आणि त्याच्या कमरेला रत्नजडित शेला बांधलेला आहे. हरीने पितांबर नेसला असून हरीच्या अंगाला चंदनाची उटी लावलेली आहे आणि त्या तेजापुढे सूर्यतेज देखील लोपले आहे. कानामध्ये मत्स्य कुंडले झळकत असून दहा ही बोटांमध्ये अंगठया आहेत व गळयात वैजयंती माळा झळकत आहे. हरीच्या दातांची ओळ म्हणजे हि-याप्रमाणेच झळकत आहे आणि हरीचे मुख अतिशय हे निर्मळ असून सुखाचीच राशी आहे. कमरेला करदोरा बाहूच्या दंडामध्ये वाक्या आणि गळयामध्ये पदके अशा प्रकारची खूप भूषणे देवाने परिधान केलेली आहे. हरणाच्या नाभीमध्ये असलेल्या कस्तुरीचा टिळा देवाने लावला असून देवाचे डोळे अतिशय विजेप्रमाणे झळाळत आहेत. तुकाराम महाराजांचे बंधू म्हणतात, हरीच्या सौंदर्यपणाचे वर्णन इतके अप्रतिम आहे की त्याची साम्यता कशाबरोबर

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग