हरी तैसे हरीचे दास ।
4054.
हरी तैसे हरीचे दास । नाही तया भय मोह चिंता आस । होउनि राहाती उदास । बळकट कांस भक्तीची ॥१॥
धरूनि पाय त्यजिले जन । न लगे मान मृत्तिकाधन । कंठी नाममृत पान । न लागे आन ऐसे झाले ॥धृपद॥
वाव तरी उदंडची पोटी । धीर सिंधु ऐसे जगजेठी । कामक्रोधा न सुटे मिठी । गिर्हे तरी वेटी राबवीती ॥२॥
बळ तरि नांगविती काळा । लीन तरि सकळांच्या तळा । उदार तरी देहासी सकळा । जाणोनि कळा सर्व नेणते ॥३॥
संसार तो तयांचा दास । मोक्ष तो पाहातसे वास । रिद्धीसिद्धी देशवटा त्रास । न शिवति यास वैष्णवजन ॥४॥
जन्ममृत्युस्वप्नांसारिखे । आप त्या न दिसे पारखे । तुका म्हणे अखंडित सुखे । वाणी वदे मुखे प्रेमामृताची ॥५॥
अर्थ :
जसा हरी आहे अगदी तसेच हरीचे दास आहेत हरीप्रमाणेच हरीच्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे भय, मोह, चिंता व इच्छा नाहीत. हरीचे दास सर्व प्रकारे उदास होऊन भक्तीची कास बळकट धरतात. त्यांनी हरीचे पाय दृढ चित्तात धारण केले आहे व लोकांचा त्याग त्यांनी केला आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा मान सन्मान लागत नाही धन पैसा हा तर त्यांना अगदी मातीप्रमाणे आहे. नामामृताचे सेवन ते आपल्या कंठाव्दारे करत असून त्यावाचून दुसरे काहीही त्यांना नकोसे झाले आहे. ज्याचे ह्दय अतिशय उदंड असून इतरांचे अनेक अपराध सहन जो करतो आणि सिंधूप्रमाणे ज्याचे धैय आहे, त्यांनी हरीचे चरणांना घट्ट मिठी दिलेली असते. मग ती मिठी कामक्रोधादीकांना देखील सुटणे शक्य नाही ते जरी बिकट ग्रहाप्रमाणे असले तरी काम क्रोधांना हे वेठबिगारीप्रमाणे राबवितात. हरीच्या दासांच्या अंगी बळ किती आहे म्हणून सांगावे तर ते काळाला देखील नाग
