ज्याचे मोक्षा मोक्षत
427.
ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणे ।
मुक्तीसी स्थापणे मुक्तत्वी ॥१॥
तो हा जगज्जनक मुरारी ।
उभा भीमातीरी पंढरिये ॥२॥
जेणे शातिसी शांतीपद ।
दिधला आनंद आनंद ॥३॥
निळा म्हणे जेणे वेद ।
केला प्रबुध्द पढवूनी ॥४॥
427.
ज्याचे मोक्षा मोक्षत्व देणे ।
मुक्तीसी स्थापणे मुक्तत्वी ॥१॥
तो हा जगज्जनक मुरारी ।
उभा भीमातीरी पंढरिये ॥२॥
जेणे शातिसी शांतीपद ।
दिधला आनंद आनंद ॥३॥
निळा म्हणे जेणे वेद ।
केला प्रबुध्द पढवूनी ॥४॥