झोंबी - अभंग २०३
203.
झोंबी - अभंग २०३
तारुण्याचे मदें घेशी एकमेंकां झोबी । वाया जाईल नरदेह धरी हरीशी झोंबी ॥१॥
तरीच खेळ भला रे वाया काय गलबला । एकावरी एक खाली पडता मारी यमाजी टोला रे ॥२॥
हातीमहात धरुनिया घालिसी गळा गळाखोडा रे । फजीत होसी खाली पडता हांसतील पोरें रांडा रे ॥३॥
एका जनार्दनी म्हणे खेळ नोहें भला रे । आपण न पडता दुजियासी पाडी तोचि खेळिया भला रे ॥४॥
