वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

परेचे शिखरावरी वस्ती

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075129 · अभंग क्र. ३८७

387.
परेचे शिखरावरी वस्ती माझी झाली ।
समरसे विराली मज माझी ॥१॥
आत्मदशे योगी लक्ष लाविती देही ।
ब्रह्मरंध्र पाही सत्पद ते ॥२॥
अणुरेणु शून्य गगना तेजे दिसे ।
निरंतर वसे निरंतर ॥३॥
ज्ञानदेव म्हणे वृत्ति सहस्रदळी लावा ।
मसुरामात्र बरवा ध्यायी जाई ॥४॥

अर्थ :
योगाभ्यास करीत असता परावाणीच्या शिखरावर बसलो व मी त्या ब्रह्मस्वरूपासी समरस झाल्यामुळे ती परावाणीही माझ्यामध्ये विरुन गेली. आत्मदशा प्राप्त व्हावी म्हणून ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी असलेल्या 'सत्' स्वरुपाकडे लक्ष लाऊन योगी लोक ध्यान करतात. त्यांना या ध्यानामुळे अणुपेक्षाही अणु व आकाशाहूनही मोठी अशी तेजस्वी वस्तु दिसते. व तदाकार वृत्ति सतत असते. ब्रह्मरंधात असणाऱ्या सहस्रदव्यतील 'सार' सत्पदाकडे आपली वृत्ति लावून मसुराकार असलेल्या ध्येयाचे ध्यान करा असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग