नासिकाचा प्राण कोणी
388.
नासिकाचा प्राण कोणी मार्गी येत ।
नाद दुमदुमित अनुहाती ॥१॥
इडे पिंगळेचा ओघ सैरा दिसतसे ।
त्यावरी प्रकाशे आत्मतेज ॥२॥
ज्ञानदेव म्हणे अष्टांग योगिया ।
साधितो उपाया याची मार्गे ॥३॥
अर्थ :
प्राणवायु नाकावाटे आत येतो. त्यामुळे आत प्राणापानाची घडामोड होऊन अनुहत ध्वनी ऐकू येतो. इडा व पिंगळा या नाड्या आतल्या आत संचार करीत असतात. तेथे त्यांना आत्मतेजाचे सहाय्य मिळते. ह्या गोष्टी योगाभ्यास करणाऱ्यालाच कळतात. अष्टांग योगाचा अभ्यास करणारे योगी याच मार्ग जाऊन परमात्मप्राप्ती करून घेतात असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
