वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ११, योग अभंग ३४२ ते ४४४

सद्गुरू निवृत्ति दिस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075143 · अभंग क्र. ३८६

386.
सद्गुरू निवृत्ति दिसतो घनदाट ।
सुषुप्तीचा घाट वेधतांची ॥१॥
आत्मा माया शिव शक्तीचे हे रूप ।
दिसते चिद्रूप अविनाश ॥२॥
ज्ञानदेव चढे ऐसी वाट देख ।
आकाशी असे मुख तिचे कैसे ॥३॥

अर्थ :
ज्ञानघन श्रीगुरू निवृत्तिरायांचे दर्शन सुषुप्तीचा घांट ओलांडल्या नंतर होते. निवृत्तीराय म्हणजेच ब्रह्म आहे. ते अविनाशी, चिद्रूप, आत्मा, माया, शिवशक्ती यांचे ही रूप तेच आहे. आम्ही या वाटेने गेलो त्या आश्चर्याची गोष्ट ही की तिचे तोंड आकाशाकडे आहे. याचा अर्थ ही वाट कठीण आहे.
असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग