वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 282. देवीची आरती ३९९८

देवीची आरती ३९९८

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-087344 · अभंग क्र. ३९९८

3998.
देवीची आरती ३९९८

मोहो म्हषासुर मारुनी बोधत्रिशुळ गळा । कामक्रोध चंडमुंडवो मर्दिले लीळा । लिंग देहे रक्तबिंदु रोशे शोषी सगळा । कर्माकर्मी शुंभनिशुंभ निवटीले लिळा ॥१॥ अनादि सिध्दतुंवा अक्षरे अविनाश योगिनी । ब्रह्मादिका अगोचरब्रह्मरुप ब्रह्मीणी । सहज तु शिवशांभवे चैतन्यभवानी ॥धृ.॥ प्रकृतीचा अंगी तु खेळसी पर पुरुषपणनित्य आरती उजळली उदोउदो म्हणोन । अनुहातचौन्डके वाजती तेणे येती स्फुरण । चौऱ्याऐंशी लक्षभुतावळे नाचविशी तुं प्राण ॥२॥ अभिन्नव तुझी दरुशने पाहणे मज । उरी सीरी बाहु भुषणे वैष्णवरज । निजतेजें दिवीं उजळु वोवाळु सहज । सच्चिदानंद गोंधळी नाजसी तुं भोज॥३॥दृश्यवो द्रष्टा दोन्ही सारुनी दरुशन देणे । देखत देखणे गिळुनी तुझे स्वरुप पाहणे । स्थावर जंगम तुंचि तुं एकले एकपणे । जिवदान बळी दिधल्यापरी प्रसत्रहोणें ॥४॥प्रणवपिठीची त्रिपुटी मैदानी वरती । त्रिगुण गिळीले अव्यक्त व्यक्ति । स्वानंद घटभरोनी चैतन्य शक्ति । एका जनार्दन एकाएकीएकलेचि प्राप्ती ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग