उभारुनी बाह्मा सकळा
479.
उभारुनी बाह्मा सकळा आश्वासन । या रे अठरा वर्ण पंढरीसी ॥१॥
दरुशने एकामुक्ति जोडे फुका । साधनांचा धोका करु नका ॥२॥
माया मोह आशा टाकुनि परती । चरणी चित्तवृत्ति जडों द्यावी ॥३॥
एका जनार्दनी सांगे लहान थोरा । पंढरीस बरा कृपाळु तो ॥४॥
