वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

एक मन तुझ्या अवघ्या

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072680 · अभंग क्र. २०१

201.
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वाटिता ते तुला येईल कैसे ॥१॥
म्हणवुनी दृढ धरी पांडुरंग । देहा लावी संग प्रारब्धाचा ॥२॥
आणिका संकल्पा नको गोऊ मन । तरीच कारण साध्य होय ॥३॥
तुका म्हणे ऐसे जाणावे उचित तरी सहज स्थित येईल कळो ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग