वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 5. तुकाराम निवडक अभंग

नित्य उठोनिया खावयाच

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072560 · अभंग क्र. २००

200.
नित्य उठोनिया खावयाची चिंता । आपुल्या तू हिता नाठविसी ॥१॥
जननीचे पोटी उपजलासी जेव्हा । चिंता तुझी तेव्हा केली तेणे ॥२॥
चातका लागुनि मेघ नित्य वर्षे । तो तुज उदास करील केवी ॥३॥
पक्षी वनचरे आहेत भूमीवरी । तयांलागी हरि उपेक्षीना ॥४॥
तुका म्हणे भाव धरून राहे चित्ती । तरि तो श्रीपती उपेक्षीना ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग