तापत्रयें तापलीया पं
399.
तापत्रयें तापलीया पंढरीसी यावे । दरुशने मुक्त व्हावे हेळामात्रें ॥१॥
दुःखाची विश्राती सुखाचा आनंद । पाहता चिदानंद विठ्ठल देव ॥२॥
संसारी तापलें त्रितापें आहाळले । विश्रांतीये आले पंढरीसी ॥३॥
सर्वांचे माहेर भाविकंचे घर । एका जनार्दनी निर्धान केला असे ॥४॥
