ज्याचे गाठी फार पुण्
334.
ज्याचे गाठी फार पुण्याची ही साठ ।
मन त्याचे विटे विषयभोगी ॥१॥
मग तो दैवाचा सांगाती निजाचा ।
सखा तो आमुचा प्राणदाता ॥२॥
आत्मसुखालागी सर्वस्व त्यागिले ।
विरक्तीसी केले साह्य जेणे ॥३॥
संसाराचा त्रास ज्यामनी उपजला ।
सर्व धनी जाला निजसुहाचा ॥४॥
उरलनि प्रालब्धे आयुष्य घालविती ।
स्वरूपाची स्थिति अखंडचे ॥५॥
बहेणि म्हणे मना सोडी मज आता ।
ब्रह्मसायुज्यता सुख देई ॥६॥
