परा ही पश्यंती मध्यम
583.
परा ही पश्यंती मध्यमा वैखरी । वसे तो श्रीहरी पंढरीये देखा ॥१॥
चारी वाच तय सदोदित गती । पुराणे भाडती अहोरात्र ॥२॥
वेद श्रुति नेति नेति म्हणताती । तो पुडंलिकापुढें प्रीती उभा असे ॥३॥
सनकसनंदन जयासी पै ध्याती । तो हरी बाळमूर्ति खेळतसे ॥४॥
योगियां ह्रुदयींचे ठेवणें सर्वथा । एक जनार्दनी तत्त्वता वोळखिलें ॥५॥
