परेहुनि परता वैखरिये
584.
परेहुनि परता वैखरिये कानडा । विठ्ठल उघडा भीतातटी ॥१॥
शिणली दरुशने भागली पुराणे । शास्त्राचियें अनुमानें न ये दृष्टी ॥२॥
नेति नेति शब्दे श्रुती अनुवादती । ते हे विठ्ठलामुर्ति विटेवरी ॥३॥
एका जनार्दनी चहू वाचां वेगळा । तेणे मज चाळा लावियेला ॥४॥
