निंबलोणकरुं पंढरीया
428.
निंबलोणकरुं पंढरीया सुखा । आणि पुडंलिका भक्तराया ॥१॥
परलोकींचे येती परतोनि मागुती । सर्व सुख येथे पहावया ॥२॥
अष्ट महासिद्धि जयाचिये द्वारी । होऊनि कामारी वोळंगतीं ॥३॥
मुक्तिपद देता न घे फुकासाठीं । ते हिंडे वाळुवंटी दीनरुप ॥४॥
एका जनार्दनी करे निंबलोण । विटेसहित चरण ओवाळावें ॥५॥
