देव भक्त उभे दोन्ही
427.
देव भक्त उभे दोन्ही एके ठायी । चला जाऊ पायी तया गांवा ॥१॥
आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारिता वाचा विठ्ठल नाम ॥२॥
करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥
अजाऊ महाद्वारी पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निंबलोण ॥४॥
एका जनार्दनी मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांही ॥५॥
