वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

वैराग्य विरक्ति साधि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076111 · अभंग क्र. ४४२

442.
वैराग्य विरक्ति साधिती शम दम ।
धूम्रपाने नेम इम्द्रियांचा ॥१॥
परी ते न साधे आत्मतत्त्व तया ।
अद्यापि संशया न सांडिती ॥२॥
राज्य त्यजूनिया बैसले वनात ।
एक ते ध्यानस्थ सर्वकाळ ॥३॥
बहेणि म्हणे देव प्रपंची असता ।
तरी का हे अवस्था भोगिती ते ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग