एक दिगंबर हिंडताती न
443.
एक दिगंबर हिंडताती नम्र ।
एक ते निमग्न सर्वकाळ ॥१॥
परि त्या अद्यापि न सापडे सत्य ।
सोलीव जे तत्त्व विवेकाचे ॥२॥
मुंडिती खंडिती दंडिती देहासी ।
एक मौनवेषी हिंडताती ॥३॥
बहेणि म्हणे जटा नखे वाढवूनी ।
हिंडती अवनी भ्रांतवेषे ॥४॥
