योग याग जप तप अनुष्ठ
209.
योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढे शीण अवघा देखे ॥१॥
नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजे नाही ॥२॥
कासया फिरणे नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काय क्लेश ॥३॥
चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥