योग याग तप व्रत आणि
210.
योग याग तप व्रत आणि दान । करिता साधन नाना क ष्ट ॥१॥
सुलभ सोपारे नाम विठोबाचे । सकळ साधनांचे मूळ बीज ॥२॥
येणे भवव्यथा तुटेल जीवाची । प्रतिज्ञा संतांची हीच असे ॥३॥
म्हणोनि नामाचा करा गदारोळ । म्हणे चोखामेळ विठ्ठल वाचे ॥४॥