(आंधळा)
3921.
(आंधळा)
आंधळ्यापागळ्यांचा एक विठोबा दाता । प्रसवला विश्व तोचि सर्व होय जाणता ।
घडी मोडी हेळामात्रे पापपुण्यसंचिता । भवदुःखे कोण वारी तुजवांचुनि चिंता ॥१॥
धर्म गा जागो तुझा तूचि कृपाळू राजा । जाणसी जीवीचे गा न सांगता सहजा ॥धृपद॥
घातली लोळणी गा पुंडलीके वाळवंटी । पंढरी पुण्य ठाव नीरे भीवरे तटी ।
न देखे दुसरे गा । झाली अदृश्यदृष्टी । वोळला प्रेमदाता केली अमृतवृष्टी ॥२॥
आणीक उपमन्यु एक बाळ धाकुटे । न देखे न चलवे जना चालते वाटे ।
घातली लोळणी गा हरीनाम बोभाटे । पावला त्याकारणे धाव घातली नेटे ॥३॥
बैसोनि खोळी शुक राहे गर्भी आंधळा । शीणला येरझारी दुःख आठवी वेळा ।
मागील सोसिले ते ना भी म्हणे गोपाळा । पावला त्याकारणे । लाज राखिली कळा ॥४॥
न देखे जो या जना तया दावी आपणा । वेगळा सुखदुःखा मोहो नाठवी धना ।
आपपर ते ही नाही बंधुवर्ग सज्जना । तुकया तेचि परी झाली पावे नारायणा ॥५॥
अर्थ :
परमार्थामध्ये आंधळया, पागळयांचा एक विठोबाच दाता आहे त्यानेच सर्व विश्वाला जन्म दिलेला असून तो सर्व जाणता आहे. देवा पाप पुण्याच्या संचितानुसार तू क्षणमात्रात घडामोडी करतोस राजाचा रंक करतोस, रंकाचा राजा करतोस आणि देवा भवदु:खाची चिंता तुझ्यावाचून दुसरे कोण निवारण करणार आहे ? देवा कृपा करण्याचा तुझा धर्म आहे तो असाच जागृत राहो जगामध्ये तूच एक कृपा करणारा कृपाळू राजा आहेस भक्ताने जरी काही सांगितले नाही तरी त्यांच्या मनातील सहज जाणणारा तू आहेस. नीराभिवरेच्या तीरी म्हणजेच्या चंद्रभागेच्या तीरी पंढरी नावाचे पुण्यक्षेत्र आहे तेथे पुंडलिकाने वाळवंटामध्ये लोळणी घा
