(आंधळा)
3922.
(आंधळा)
सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे । वृत्ति हे निवृत्ति झाली जन न दिसे तेथे ।
मी माजी हारपले ठायी जेथींचा तेथे । अदृश्य तेचि जाले काही दृश्य जे होते ॥१॥
सुखी मी निजलो गा शून्य सारूनि तेथे । त्रिकूटशिखरी गा दान मिळे आइते ॥धृपद॥
टाकिली पात्र झोळी धर्मअधर्म आशा । कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वोळसा ।
न मागे मी भीक आता हाचि झाला भरवसा । वोळली सत्रावी गा तिणे पुरविली इच्छा ॥२॥
ऊर्ध्वमुखे आळविला सोहं शब्दाचा नाद । अरूप जागविला दाता घेऊनि छंद ।
घेऊनि आला दान निजतत्व निजबोध । स्वरूपी मेळविले नांव ठेविला भेद ॥३॥
शब्द हा बहुसार उपकाराची राशी । म्हणोनि चालविला मागे येतील त्यासी ।
मागोनि आली वाट सिद्धओळीचि तैसी । तरले तरले गा आणीक ही विश्वासी ॥४॥
वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव । जाणिवनागवण नेदी लागो ते ठाव ।
म्हणोनि संग टाकी सेवी अद्वैत भाव । तुका म्हणे हाचि संती मागे केला उपाव ॥५॥
अर्थ :
माझी दृष्टी नीज निराकार मार्गाकडे जात आहे त्यामुळे मी सहजच आंधळा झालो आहे माझ्या वृत्तीची, निवृत्ती झाली आहे त्यामुळे मला लोकच दिसत नाही. मी आणि माझे हा भ्रम आता जेथेच्या तेथेच नाहीशा झाला आहे त्यामुळे जे माझ्यासाठी दृश्य होते आता ते अदृश्य झाले आहे. सर्व शून्याला आणि त्रिकुटीला बाजूला सारुन मी सुखाने निजलो आहे मला तेथे आयते दान मिळाले आहे. मी आता धर्म, अधर्म, आशारुपी पात्र, झोळी टाकून दिली आहे संसाराचा कोल्हाळ चुकविला आहे आणि सत्व, रज, तम या त्रिगुणाचा वळसा देखील चुकविला आहे आता मी कुठेही भीक मागणार नाही याविषयी मला भरवसा झाला आहे आणि सतरावी जी ज
