संतोषाकारणे सज्जन जी
524.
संतोषाकारणे सज्जन जीवासी | साहाकारी होसी नारायणा ॥१॥
समान करिसी सर्व भूती जाण | पतीतपावन भाक तुझी ॥२॥
भक्ति भाव ज्यांचा भाग्ये आगळिया | होसी देवराया सर्वविध ॥३॥
समर्थपणासी कोणा विचारावे | नामा म्हणे भावे कारण हा ॥४॥