सांवळे सगुण उभे कर क
35.
सांवळे सगुण उभे कर कटी । मूर्ति हे गोमटी बाळरूप ॥१॥
शंख चक्र करी ते कटावरी । पीतांबर धारी चतुर्भुज ॥२॥
लावण्याचा गाभा श्रीमुख चांगले । श्रीवत्स शोभले हृदयावरी ॥३॥
बंका म्हणे धन्य देवांचा हा देव । वैकुंठीचा राव पंढरीये ॥४॥
