देव दाखवी ऐसा नाही ग
474.
देव दाखवी ऐसा नाही गुरु | जेथे जाय तेथे दगड शेंदरु ॥१॥
देव दगडाचा बोलेल कैंचा | कोणे काळी त्यास फुटेल वाचा ॥२॥
देव देव करिता शिणले माझे मन | जेथे जाय तेथे पूजा पाषाण ॥३॥
नामा तोचि देव हृदयी पाहे | नामा केशवाचे न सोडी पाय ॥४॥
