काल्याचिये आसे । देव
226.
काल्याचिये आसे । देव जळी झाले मासे ।
पुसोनिया हासे । टिरीसांगाते हात ॥१॥
लाजे त्यासी वांटा नाही । जाणे अंतरींचे तेही ।
दान होता काही । होऊ नेदी वेगळे ॥२॥
उपाय अपाय यापुढे । खोटे निवडिता कुडे ।
जोडुनिया पुढे । हात उभे नुपेक्षी ॥३॥
ते घ्या रे सावकाशे । जया फ़ावेल तो तसे ।
तुका म्हणे रसे । प्रेमाचिया आनंदे ॥४॥
