वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 4. काला अभंग प्रकरण › २, काल्याच्या कीर्तनाचे अभंग

घ्या रे भोकरे भाकरी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073029 · अभंग क्र. २२५

225.
घ्या रे भोकरे भाकरी । दहीभाताची शिदोरी ।
ताक सांडा दुरी । असेल ते तयापे ॥१॥
येथे घ्यावे तैसे द्यावे । थोडे परी निरे व्हावे ।
सागतो रे ठावे । असो द्या रे सकळा ॥२॥
माझे आहे तैसे पाहे । नाही तरी घरा जाये ।
चोरोनिया माये । नवनीत आणावे ॥३॥
तुका म्हणे घरी । माझे कोणी नाही हरी ।
नका करु दुरी । मज पाया वेगळे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग