आजि ओस अमरावती । काल
227.
आजि ओस अमरावती । काला पाहावया येती ।
देव विसरती । देहभाव आपुला ॥१॥
आनंद न समाये मेदिनी । चारा विसरल्या पाणी ।
तटस्थ त्या ध्यानी । गाई झाल्या श्वापदे ॥२॥
जे या देवांचे दैवत । उभे असे या रंगात ।
गोपाळांसहित । क्रिडा करी कान्होबा ॥३॥
तया सुखाची शिराणी । तींच पाऊले मेदिनी ।
तुका म्हणॆ मुनी । धुंडिता न लभती ॥४॥
