वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

उठा भागलेती उजगरा ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-079516 · अभंग क्र. ४००२

4002.
उठा भागलेती उजगरा । जाला स्वामी निद्रा करा ॥१॥
वाट पाहाते रुक्मिणी । उभी मंचक संवारुणी ॥धृपद॥
केली करा क्षमा । बडबड पुरुषोत्तमा ॥२॥
लागतो चरणा । तुकयाबंधु नारायणा ॥३॥

अर्थ :
स्वामी तुम्ही बाहेरील येरझार्‍या घालून फारच थकले आहात चला आता तुम्ही निद्रा करा. सर्व सेज पलंग आवरुन रुक्मिणी देवी तुमची वाट पाहात आहेत. हे पुरुषोत्तमा मी जी काही बडबड केली आहे त्याबद्दल मला तुम्ही क्षमा करा. तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा म्हणतात, हे नारायणा मी तुमच्या चरणी लीन होत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग