येरे शब्द ते ऐकोन ।
100.
येरे शब्द ते ऐकोन ।
उभा ठाकला जगज्जीवन ।
माता म्हणे हे अवगुण ।
कांरे ऐसे करितोसी ॥१॥
ठायी वाडिलिया न जेविसी ।
आणि येथे माती खाशी ।
येरु म्हणे नाही ऐशी ।
प्रतिज्ञा मी दावीन ॥२॥
तव ते म्हणे दावी मुख ।
येरु म्हणे तरी हे देख ।
पाहे तव माजी त्रैलोकय ।
चंद्रसूर्य तारांगणे ॥३॥
मेरुकुळाचाळ पर्वत ।
नदादि नदीयांचे ओघ वहात ।
सप्तहि सागर भरते येत ।
ऐसे देखत वदनामाजी ॥४॥
भोवंडी आली पहाता नयना ।
मग म्हणे निमटी निमटी आता वदना ।
माव तुझी जगज्जीवना ।
नकळेचि आम्हा प्राकृता ॥५॥
मग धरुनिया तो करतळी ।
आलिंगिला हदयमेळी ।
विस्मये दाटोनिया वेल्हाळी ।
आली घेउनी मंदिरा ॥६॥
निळा म्हणे सांगे लोका ।
अपूर्व देखिले म्या कौतुका ।
मृत्तिकामिसे माजी त्रैलोक्या ।
पाहिले वदनी हरिचिया ॥७॥
