ऐकोनी सीतेच्या उत्तर
931.
ऐकोनी सीतेच्या उत्तरीं । पुर्णावस्था मंदोदरी । चढली स्वेदकंप शरीरी । आनंदलहरी दाटली ॥१॥
इंद्रिय विकळता जाली । चित्त चैतन्य मिठी पडली । अंतरी सुखोर्मी दाटई । तेणेंपडली मुर्छित ॥२॥
बाप सदगुरुचे सामर्थ्य । अलोकिक अति अदभुत । वचनमात्रें शक्तिपात । जाला निश्चित मंदोदरी ॥३॥
नाही हस्त मस्तक । कृपा कवळोनी देख । वचनामात्रें दिधले सुख । एका जनार्दनी सरेना ॥४॥
