नामाचे सामर्थ्य न कळ
198.
नामाचे सामर्थ्य न कळे ब्रह्मादिका । वेडावली देखा वेदशास्त्रे ॥१॥
ते कलियुगी सुलभ पै झाले । उभे ते राहिले पंढरीये ॥२॥
आगमा निगमा न कळेची पार । तो गोकुळी साचार चोरी करी ॥३॥
जयालागी श्रुति अनुवादता भागली । ठकलीच ठेली नेति शब्दे ॥४॥
चोखा म्हणे ऐसा दुर्लभ सर्वांसी । तो हा पंढरीसी उभा विटे ॥५॥
