वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

लोकांचिया मुली खेळती

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075856 · अभंग क्र. ५४७

547.
लोकांचिया मुली खेळती बोळकी ।
वाटे घ्यावे मुखी मज नाम ॥१॥
आणिक नावडे खेळ तो बालिश ।
नेणे तो विश्वास प्रगटला ॥२॥
नावडे फुगडी टिपरियांचा खेळ ।
असावे निश्चळ वाटे मना ॥३॥
बहिणी म्हणे पूर्वी होते जे पदरी ।
तेची या संसारी प्रगटले ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग